मध्य रेल्वेने (Central Railway) लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथे पायाभूत सुविधांच्या उर्वरित कामांसाठी 4 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2026 या कालावधीत 11 दिवसांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक जाहीर केला आहे.
हा ब्लॉक 4 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून 14 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
शंटिंग नेकचे बांधकाम
सिक सायडिंगमध्ये बदल
देखभाल सायडिंग यार्डचे काम
देखभाल सायडिंग क्रमांक 6, 7, 8 आणि 9 वरील पिट लाईनचा विस्तार
पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि स्टॉर्म वॉटर लाईनचे डायव्हर्जन
सिक कलेक्शन लाईन
वॉशिंग पिट लाईन क्रमांक 6, 7 आणि 8
स्टेबलिंग लाईन क्रमांक 5
C&W सिक लाईन क्रमांक 1, 2, 3 आणि 4
12154 राणी कमलापती – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (7 ऑगस्ट 2026 रोजी सुरू होणारा प्रवास)
16346 तिरुवनंतपुरम – लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस (3 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट 2026 दरम्यान सुरू होणारे सर्व प्रवास)
या दोन्ही गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनसऐवजी ठाणे स्थानकापर्यंतच धावतील.
मध्य रेल्वेने प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत, प्रवासाचे नियोजन आगाऊ करण्याचे आवाहन केले आहे. हा ब्लॉक रेल्वे पायाभूत सुविधांच्या उन्नतीकरणासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यावश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा