पुणे-गोरखपूर एक्सप्रेस आता एसी कोचसह धावणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मध्य रेल्वेने (CR) खाली नमूद केलेल्या तारखांपासून पुणे-गोरखपूर एक्सप्रेसमध्ये फर्स्ट एसी कोच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गोरखपूर-पुणे एक्‍सप्रेस एक्‍स गोरखपूर 06/10/2022 पासून  तर 08/10/2022 पासून 15030 पुणे-गोरखपूर एक्स्प्रेस एसी कोचसह धावेल.

सुधारित रचना: एक फर्स्ट एसी, टू एसी-2 टायर, 8 एसी-3 टायर, 5 स्लीपर क्लास, पाच जनरल सेकंड क्लास एक गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन.

याशिवाय, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने वाडी आणि हैदराबाद दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

तपशील खालीलप्रमाणे:-

07175 अनारक्षित स्पेशल हैदराबाद 12.08.2022 रोजी 10.05 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 15.30 वाजता वाडी येथे पोहोचेल.

07176 अनारक्षित विशेष गाडी 12.08.2022 रोजी 16.20 वाजता वाडीहून निघेल आणि त्याच दिवशी 21.20 वाजता हैदराबादला पोहोचेल.

07177 अनारक्षित स्पेशल हैदराबाद 14.08.2022 रोजी 05.00 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 10.15 वाजता वाडी येथे पोहोचेल.

07178 अनारक्षित विशेष गाडी 14.08.2022 रोजी 11.05 वाजता वाडीहून निघेल आणि त्याच दिवशी 16.00 वाजता हैदराबादला पोहोचेल.

मुक्काम: बेगमपेट, सनथनगर, हाफीजपेठ, लिंगमपल्ली, नागलापल्ली, शंकरपल्ली, गुल्लागुडा, चिटगिड्डा, विकाराबाद, गोदामगुरा, धारूर, रुक्मापूर, तंदूर, मंतट्टी, नवांदगी, कुरगुंटा, सेराम, मलखैद रोड आणि चित्तापूर.

रचना: 2 गार्डच्या ब्रेक व्हॅनसह 18 सामान्य द्वितीय श्रेणी.

प्रवाशांना त्यांच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी COVID-19 नियमांचे पालन करण्याचा सल्ला रेल्वे तर्फे देण्यात आला आहे.


हेही वाचा

विरार ते मीरा रोड मार्गावर मेट्रोची गरज, राजेंद्र गावितांची लोकसभेत मागणी

पालिकेच्या मदतीनं मध्य रेल्वे बांधणार १० नवे फुट-ओवर ब्रिज

पुढील बातमी
इतर बातम्या