सेंट्रल रेल्वेने (CR) प्रवाशांना सोयीस्कर आणि जलद तिकीट खरेदीची सुविधा देण्यासाठी ‘मोबाईल यूटीएस सहायक’ (Mobile UTS Sahayaks) ही नवी सेवा सुरू केली आहे. केवळ 13 दिवसांत त्यांनी 20.33 लाख रुपयांचे उत्पन्न नोंदवले आहे.
सेंट्रल रेल्वेने प्रवाशांना पटकन तिकिट काढता यावे यासाठी एटीव्हीएम, यूटीएस प्रणाली, मोबाईल यूटीएस अशा विविध सुविधा आधीपासून उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये नव्याने मोबाईल यूटीएस सहायक या सेवेची भर पडली आली आहे.
31 ऑक्टोबर 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे ही सेवा सुरू करण्यात आली. सुरुवातीला 3 सहायक प्रवाशांच्या तिकीट खरेदीसाठी मदत करत आहेत.
या M-UTS सहायकांना मोबाईल फोन आणि छोट्या तिकीट प्रिंटिंग मशीनची सुविधा देण्यात आली आहे. हे सहायक कॉन्कोर्स, होल्डिंग एरिया किंवा रेल्वे परिसरातील रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांजवळ जाऊन तिकिटांचे भाडे घेतात आणि तिकिटे जागेवरच छापून देतात.
गरज पडल्यास ते काउंटरमध्ये बसूनही तिकिटे जारी करू शकतात. प्रवाशांना डिजिटल किंवा रोख अशा दोन्ही प्रकारे पैसे देण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
31 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर 2025 दरम्यान या सेवेच्या माध्यमातून 12,733 तिकिटांची विक्री होऊन 20.33 लाख रुपये उत्पन्न झाले आहे.
सीएसएमटी व्यतिरिक्त, नवी दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू आणि चेन्नई या रेल्वे स्थानकांवरही मोबाईल यूटीएस सहायक सेवा सुरू करण्यात आली आहे.
मोबाईल यूटीएस सहायक ही सुविधा तिकीट खरेदी प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद करण्यासाठी सेंट्रल रेल्वेने सुरू केलेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे.
प्रवाशांना ही सेवा सोयीस्कर आणि वेळ बचत करणारी असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
हेहीा वाचा