मध्य रेल्वेकडून CSMT–नागपूर आणि LTT–मडगाव मार्गावर 4 विशेष गाड्या

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

प्रवाशांच्या वाढलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे (CR) तर्फे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – नागपूर तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – मडगाव मार्गावर एकूण ४ विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत.

1) CSMT – नागपूर – CSMT विशेष (२ फेऱ्या)

गाडी क्रमांक 02139

CSMT वरून 25.01.2026 रोजी रात्री 00.20 वाजता सुटेल

आणि त्याच दिवशी 15.30 वाजता नागपूरला पोहोचेल.

गाडी क्रमांक 02140

नागपूरवरून 25.01.2026 रोजी रात्री 20.00 वाजता सुटेल

आणि पुढील दिवशी 13.30 वाजता CSMT ला पोहोचेल.

थांबे :

दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बादनेरा, धामणगाव आणि वर्धा.

डबे रचना :

1 एसी 2-टियर,

6 एसी 3-टियर,

9 स्लीपर क्लास,

4 जनरल सेकंड क्लास,

1 जनरल सेकंड क्लास सह गार्ड्स ब्रेक व्हॅन

आणि 1 जनरेटर व्हॅन

(LHB डबे)

2) LTT – मडगाव – LTT विशेष (२ फेऱ्या)

गाडी क्रमांक 01129

LTT वरून 25.01.2026 रोजी पहाटे 01.00 वाजता सुटेल

आणि त्याच दिवशी 12.00 वाजता मडगावला पोहोचेल.

गाडी क्रमांक 01130

मडगाववरून 25.01.2026 रोजी दुपारी 14.30 वाजता सुटेल

आणि पुढील दिवशी पहाटे 04.05 वाजता LTT ला पोहोचेल.

थांबे :

ठाणे, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.

डबे रचना :

1 एसी 2-टियर,

3 एसी 3-टियर,

8 स्लीपर क्लास,

4 जनरल सेकंड क्लास

आणि 2 जनरल सेकंड क्लास सह गार्ड्स ब्रेक व्हॅन

(ICF डबे)

आरक्षण माहिती :

गाडी क्रमांक 02139, 02140 आणि 01129 साठी

आरक्षण सर्व PRS केंद्रांवर तसेच IRCTC वेबसाइट (www.irctc.co.in) वर सुरू आहे.

अनारक्षित डब्यांसाठी तिकीट UTS अ‍ॅपद्वारे सामान्य दरात काढता येईल.

या विशेष गाड्यांच्या थांब्यावरील सविस्तर वेळापत्रकासाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES अ‍ॅप डाउनलोड करा.

प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी.


हेही वाचा

एसी लोकलमुळे चर्चगेट–विरार मार्गावरील सामान्य प्रवाशांना फटका

पुढील बातमी
इतर बातम्या