कळव्यात गॅस सिलेंडरचा स्फोट; ४ जण जखमी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

ठाणे जिल्ह्यातील कळवा परिसरात गॅसचा स्फोट झाला. या स्फोटात ४ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. ठाण्यातील कळवा परिसरात येथील शिवशक्ती नगरभागात एका घरगुती गॅस सिलेंडर कंपनीच्या एजन्सीमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला.

सत्यम यादव (२०), अनुराज सिंह (१९), रोहीत यादव (२०), गणेश यादव (१९) अशी जखमींची नावे आहेत. हे सर्वजण ८० ते ९० टक्के भाजले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शिवशक्ती नगरभागात एका घरगुती गॅस सिलेंडर कंपनीच्या एजन्सीमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. रविवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमासार ही दुर्घटना घडली. या घटनेत एजन्सीमध्ये काम करणारे ४ जण जखमी झाले आहेत.

रविवारी रात्री शिवशक्ती नगरभागात सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटामुळे घराचे पत्रेदेखील खाली पडले तसंच भितींनाही तडा गेला. या स्फोटात चौघे जखमी झाले असून गंभीर जखमी आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या