विरार इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

पालघर जिल्ह्यातील विरारमधील रमाबाई अपार्टमेंट ही चार मजली इमारत मंगळवारी (26 ऑगस्ट) रात्री कोसळली. 

राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह असताना विरारमध्ये मात्र ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढले जात आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अवघे 15 वर्षे जुनी इमारत कशी कोसळली, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

बुधवारी ढिगाऱ्यामधून 20 ते 25 जण अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला (Virar Building Collapse 15 dead) आहे. अद्यापही NDRF चे सर्च ऑपरेशन सुरू आहे. 

इमारत अरुंद गल्लीत असल्याने येथे रेस्क्यू ऑपरेशनसाठी गाडी आणि रुग्णवाहिका पोहोचवणं कठीण झालं होतं. त्यामुळे एनडीआरएफच्या टीमला मॅन्यूअली रेस्क्यू ऑपरेशन करावं लागलं. ज्यामुळे बराच वेळ लागला. अद्यापही इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री 12.05 च्या सुमारास इमारतीचा मागील भाग कोसळला. वसई विरार महानगरपालिकेने (VVMC) तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी इमारतीच्या बिल्डरला अटक केली आहे.

अधिकाऱ्यांनी आतापर्यंत आरोही ओंकार जोविल (24), त्यांची एक वर्षाची मुलगी उत्कर्षा जोविल, लक्ष्मण किस्कू सिंग (26), दिनेश प्रकाश सपकाळ (43), सुप्रिया निवलकर (38), अर्णब निवलकर (11) आणि पार्वती सपकाळ अशी सात मृतांची ओळख पटवली आहे.


हेही वाचा

खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी 10 तास काम करण्याचा प्रस्ताव

कबुतरांवरील अभ्यासाठी महाराष्ट्र सरकारची 12 सदस्यांची समिती स्थापन

पुढील बातमी
इतर बातम्या