अर्धवट कामाकडे महापालिकेचं दुर्लक्ष

  • पूजा वनारसे & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

गिरगाव ठाकूरद्वार - अर्धवट कामाकडे महापालिका दुर्लक्ष करत असल्याचा प्रकार गिरगावच्या ठाकूरद्वार परिसरात पाहायला मिळतोय. ठाकूरद्वारच्या सेंट्रल प्लाझा सिनेमा येथील रस्त्याच्या दुरुस्तीचं काम तीन महिन्यांपासून सुरू आहे. तरी ते झालेलंच नाही. महापालिका कर्मचाऱ्यांकडून याकडे कानाडोळा होत असल्याचं पाहायला मिळतंय.

काम पूर्ण होणं तर सोडाच, पण काम करताना निघालेली माती आणि क्राँक्रिटचा कचरा अद्यापही उचलण्यात आलेला नाही. तीन महिन्यांपूर्वी पालिकेनं हे काम करण्यास सुरुवात केली होती, अशी माहिती स्थानिक दुकानदारांनी दिली. माती आणि राड्यारोड्याचा ढीग स्थानिकांसाठी त्रासदायक ठरतोय. वाऱ्यामुळे माती सगळीकडे पसरतेय. पादचाऱ्यांना त्यातूनच कसाबसा मार्ग काढावा लागतोय. हा रस्ता नेहमी गजबजलेला असतो, शिवाय इथे चित्रपटगृहही आहे. रस्त्यात पडलेल्या या ढिगाऱ्याचा नाहक त्रास होतोय, असं दुकानमालक निमेश जैन यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या