आपले स्टेशन आपली शान

  • अपर्णा गोतपागर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

‘हमारा स्टेशन, हमारी शान’ या उपक्रमांतर्गत घाटकोपर स्टेशनचा कायपालट झाला आहे. मेकिंग अ डिफरन्स आणि मुंबई फर्स्ट या संस्थांनी पुढाकार घेत हा उपक्रम राबवला. यामध्ये कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचारी आणि के. जे. सोमय्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्टेशनवरील मेट्रोला जोडणाऱ्या पादचारी पुलावर एका बाजूला प्रसिद्ध ठिकाणांची तर दुसऱ्या बाजूला पर्यावरण, शैक्षणिक आणि देशभक्तीचे संदेश देणारे चित्र रेखाटण्यात आले. पहिल्या पादचारी पुलावर पर्यावरण, रक्तदान, 'पाणी वाचवा' आणि 'बेटी बचाव' सामाजिक संदेशातून नागिरकांना प्ररेणा देणारे चित्र काढण्यात आले. तर तिसऱ्या पादचारी पुलावर चाँद मीनार, लखनऊ, मैसूर आणि हम्पी यांसारख्या छोट्या शहरातील ऐतिहासिक स्थळे चित्रातून दाखवण्यात आले. यामध्ये एकूण १२० ते १५० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आहे. .

पुढील बातमी
इतर बातम्या