मुंबईतील अवैध कत्तलखाने बंद करण्याची मागणी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

उत्तर प्रदेशमध्ये अवैध कत्तलखान्यांवर ज्याप्रकारे कारवाई केली जात आहे त्याचे लोण आता मुंबईतही पोहोचले आहे. भाजपाचे अामदार तारासिंह यांनी गुरुवारी विधानसभेमध्ये राज्यातील अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. गुजरात आणि उत्तर प्रदेश सरकारने अवैध कत्तलखाना बंदीबाबत जसा पवित्रा घेतला,  तसा पवित्रा राज्य सरकारनेही घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

जैन धर्मियांच्या पर्यूषण सणासाठी गुजरात आणि हरियाणामध्ये पूर्णपणे मांसबंदी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुंबई आणि राज्यभरामध्ये त्या दिवसांसाठी मांसबंदी करावी, कारण राज्यामध्ये अशा पवित्र दिवशी अधिकृत कत्तलखान्यामधून मांसविक्री होत नाही मात्र अनधिकृत कत्तलखान्यामधून मांसविक्री सुरूच असते असे असं सांगत अशा अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. विधानसभेमध्ये भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनीही याबाबत राज्य सरकारचे एकूण धोरण काय आहे, ते जाहीर करावे अशी मागणी केली.

पुढील बातमी
इतर बातम्या