आंब्याची परदेशातील मागणी घटली

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

परदेशातील मागणी घटल्याने 'कॅनिंग' (canning) कंपन्यांनी यंदा आंब्याची कमी प्रमाणात खरेदी केली आहे. परिणामी आंब्याचा (mangoes) दर आता थेट 62 रुपयांवरून प्रती किलो थेट 17 रुपयांपर्यंत खाली घसरला आहे.

अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे केवळ दहा ते पंधरा टक्केच आंबा झाला आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना 'कॅनिंग'च्या आंब्यांचे दर कमालीचे घसरल्याने शेतकरी तसेच बागायतदारांवर दुहेरी संकट ओढवले आहे.

'कॅनिंग'चा दर सुरुवातीला 62 रुपये प्रति किलो इतका होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा दर घसरत जाऊन आता तो 17 रुपये प्रति किलो इतका खाली आला आहे.

आंब्यापासून रस (pulp),जाम, आंबा वडी, सरबते,लोणची, चॉकलेट आदी विविध खाद्य पदार्थ तयार केले जातात. शिवाय आईस्क्रीमसाठी या आंब्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.

आईस्क्रीम उद्योगातील मोठमोठ्या कंपन्यांमार्फत या आंब्यांची खरेदी केली जाते. मात्र शेतकरी तसेच बागायतदारांना हवा तसा दर दिला जात नाही. परिणामी त्यांना नुकसान सोसावे लागते.

परदेशात 'पल्प'ला मोठी मागणी आहे. मात्र आखाती युद्धामुळे यंदा निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी तसेच बागायतदार धास्तावले आहेत.

राज्य सरकारने यावर शेतकरी तसेच बागायतदारांसाठी नुकसान भरपाई जाहीर केली. मात्र जाहीर केलेली रक्कम अत्यंत तुटपुंजी असल्याचे म्हणत आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील शेतकरी तसेच बागायतदारांनी मुंबईत (mumbai) मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा 'निवासस्थानी धडक देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार मोर्चाही निघाला.


हेही वाचा

दक्षिण मुंबईतील वारसास्थळांच्या देखभालीसाठी BMCची खासगी एजन्सी नियुक्तीची तयारी

गोवंडी नाल्यातील प्रदूषण पुन्हा चर्चेत

पुढील बातमी
इतर बातम्या