अवैध फेरीवाल्यांवर पालिकेची कारवाई

  • रोहित पोखरकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मोहम्मद अली रोड - येथील 15 अवैध फेरीवाल्यांवर बुधवारी पालिकेने कारवाई केली. पालिकेचे सहाय्यक आयुक्त उद्यकुमार शिरूरकर यांनी ही कारवाई केली. विशेष म्हणजे या भागातील अनेक दुकानांमध्ये उद्य कुमार गेले आणि त्यांनी परवाने आहेत का याची तपासणी केली.

शिरूरकर एवढ्यावरच थांबले नाही  तर त्यांनी अनधिकृत जागेत अधिकृत परवाना काढून ठाण मांडलेल्या दुकानांवर देखील कारवाई केली. खाण्याच्या स्टॉल्सपासून कपड्यांच्या स्टॉल्सपर्यंत त्यांनी ही धडक कारवाई केली. यावेळी सहाय्यक कनिष्ठ अभियंता अतुल लोंढे यांच्यासह पालिकेचे आठ अधिकारी उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या