गोरेगावमध्ये नागरीकामांचा शुभारंभ

  • श्रद्धा चव्हाण & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

गोरेगाव - गोरेगाव पूर्व कामा ईस्टेट या ठिकाणी शिवसेना नगरसेवक सुनील प्रभु यांच्या नगरसेवक निधीतून नागरी कामांचा शुभारंभ झाला आहे. कामा इस्टेटला शिवशंकरनगर आझादनगर, गणेशनगर, सखाराम तुकाराम मार्ग यमुना चाळ, आ.य.बी पटेल मार्ग येथे लादीकरण,शौचालय दुरुस्ती,गटारं दुरुस्ती, शौचालय नूतनीकरण अशा विविध नागरी कामांचा शुभारंभ शनिवारी प्रभु यांनी केला. या वेळी सर्व गटप्रमुख शिवसैनिक, युवासैनिक महिला आघाडी आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या