फुटपाथ की धोबीघाट

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

वडाळा - वडाळा पश्चिमेतील बस डेपोजवळील रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या फुटपाथला धोबी घाटाचे स्वरूप आले आहे. या फुटपाथवर राहणारे झोपडपट्टीवासी जुने कपडे धुवून इथेच वाळत घालतात. त्यामुळे पादचाऱ्यांना या मार्गावरून चालणे कठीण झाले आहे.

वडाळा टिळक रोड मार्गावर वडाळा डेपो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि बृहन्मुंबई विद्युत पुरवठा केंद्र आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमीच प्रवाशांची वर्दळ पाहायला मिळते. या मार्गाच्या कडेला असलेल्या पदपथांवर काही कुटुंबांनी आपला संसार थाटला आहे. ही कुटुंबे जुने कपडे धुवून बाजारात विकतात. त्यासाठी गोळा केलेले जुने कपडे धुवून फुटपाथवरच वाळत घातले जातात.त्यामुळे येथून प्रवास करणारे पादचारी नाराजी व्यक्त करत आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या