हा कचरा कोण साफ करणार?

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

माहीम - गणेशोत्सव विसर्जनाकरिता माहीम चौपाटी स्वच्छ करण्यात आली होती. विसर्जनानंतर मुंबईतील सर्व चौपाट्या तात्काळ साफ करण्यात येतील असे ही पालिकेच्या वतीने सांगण्यात आले होते. परंतु माहीम चौपाटीवर विसर्जनाच्या दिवशी शेकडो टन निर्माल्य एका कोपऱ्यात टाकण्यात आलं असून चार दिवस उलटूनही हा कचऱ्याचा ढीग अदयाप उचलण्यात आलेला नाही. त्यामुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत. तसंच महापालिकेने कचरा उचलण्यासाठी ताबडतोब उपाययोजना करावी अशी मागणी करीत आहेत. आधीच साथीच्या आजाराने डोके वर काढले असताना डेंग्यूच्या तापामुळे ही शेकडो मुंबईकर हैराण झाले आहेत. त्यामुळे पालिकेचा ढिसाळ कारभार जीवघेणा ठरू शकतो, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या