बोरीवली ते मालाडला जोडणाऱ्या आणि बिग बाजारच्या जवळील हायवेच्या मधोमध असलेला डिव्हायडर सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. या डिव्हायडरला आदळून अनेकदा वाहनांना अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेक जण जखमी तर साद तिरंदाज (20) आणि बिलाल अन्सारी(20) या दोन विद्यार्थ्यांना जीव गमावावा लागला होता.
दरम्यान, याबातत उत्तर विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी इन्सुलिन यांना विचारले असता त्यांनी 'हा डिव्हायडर हायवे एक्सटेन्शनचा डिव्हायडर आहे. हा डिव्हायडर जर हटवला तर त्यामुळे ब्रिजच्या वरच्या भागावर प्रभाव पडेल आणि जर त्याचे फिनिशिंग केले तर ब्रिजवर अतिरिक्त भार पडू शकतो. ज्यामुळे ब्रिज पडू शकतो' असे कारण दिले.