डोंबिवलीत रेल्वे गेटजवळ तात्पुरते वाहतूक बदल

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

ठाणे ट्राफिक पोलिसांनी (Thane Traffic Police) यांनी डोंबिवली Dombivli पश्चिमेतील मोथागाव रेल्वे गेट क्रॉसिंगजवळ रेल्वेसंबंधित अत्यावश्यक कामांमुळे तात्पुरते वाहतूक बदल जाहीर केले आहेत.

पंकज शिरसाट (Pankaj Shirsat) यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, हे काम Express Fight Railway Consortium मार्फत 19 मे ते 21 मे 2026 दरम्यान दररोज रात्री 12.01 ते सकाळी 6 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे.

या काळात मोथागाव रेल्वे गेट क्रॉसिंग (Mothagaon Railway Gate Crossing), रेती बंदर रोड (Reti Bandar Road) परिसरातील दोन्ही बाजूंवरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून पर्यायी मार्गांवर वळवली जाणार आहे.

कोणते मार्ग बंद राहणार?

  • स्वामी नारायण सिटी चौक (Swami Narayan City Chowk) ते मोथागाव रेल्वे गेट क्रॉसिंगकडे जाणारी सर्व वाहने वॉटर टँक, नवीन कोपर गाव क्रॉस रोड येथे बंद करण्यात येतील.

पर्यायी मार्ग:

वाहनांना उजवे वळण घेऊन नवीन कोपर गाव क्रॉस रिंग रोडमार्गे इच्छित स्थळी जाता येईल.

  • प. दीनदयाळ उपाध्ये मार्ग (Pt. Deendayal Upadhyay Marg) आणि रेती बंदर रोडवरून मोथागाव रेल्वे गेटकडे जाणारी वाहने रेती बदर चौक (Retibandar Chowk) येथे बंद राहतील.

पर्यायी मार्ग:

वाहनांना पं. दीनदयाळ उपाध्याय मार्ग – एम. गांधी रोड – कोपर रोड – नवीन कोपर गाव क्रॉस रिंग रोडमार्गे रेल्वे गेटच्या पुढील भागात जाता येईल.

अत्यावश्यक सेवांना सूट

वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, हे निर्बंध पोलीस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन गॅस वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवा वाहनांना लागू राहणार नाहीत.

दरम्यान, ठाणे ट्राफिक पोलिसांनी (Thane Traffic Police) यापूर्वीही कासारवाडी (Kasarvadavali) परिसरात सुरू असलेल्या बोरिवली टनल प्रोजक्ट (Borivali Tunnel Project) मुळे तात्पुरत्या रस्ता बंदीची घोषणा केली होती. त्या अंतर्गत हिलक्रेस्ट सोसायटी, मुल्ला बाग ते नीलकंठ ग्रीनदरम्यानचा रस्ता ठरावीक कालावधीसाठी बंद ठेवण्यात आला असून वाहतूक विरुद्ध दिशेने वळवण्यात आली आहे.


हेही वाचा

मुंबई पूर्व उपनगरात ऑड-इव्हन पार्किंग नियम लागू

पुढील बातमी
इतर बातम्या