सरकारविरोधात घरेलू कामगारांची निदर्शने

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

सीएसटी - सरकारविरोधात घरेलू कामगार संघाने बुधवारी आझाद मैदानात निदर्शने कली. सरकारने घरेलु कामगारांसाठी कल्याण मंडळ स्थापन केले. मात्र त्यात सुरू करण्यात आलेल्या सन्मान, जयश्री विमा आणि शिष्यवृत्ती योजना गेल्या 2 वर्षांपासून बंद केल्या आहेत. त्यातला कोणताच लाभ कामगारांना मिळाला नाही. कामगारांच्या वतीने सरकारकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र सरकारने त्याची कोणतीच दखल घेतली नसल्याचे घरेलू कामगार संघाचे अध्यक्ष अनिल दुमणे यांनी सांगितले.

घरेलू कामगारांच्या मागण्या

  • अधिनियम 1948 अंतर्गत किमान वेतन निर्धारित करावे
  • कामाच्या ठिकाणी सोडा आणि साबण यापासून कामगारांना संरक्षण म्हणून सुरक्षा साधने देणे
  • दर 6 महिन्यांनी कामगारांची आरोग्य तपासणी
  • घरेलू कामगारांना साप्ताहिक सुट्टी देणे
  • घरेलू कामगारांना मंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या सन्मान धन, जनक्षी विमा या योजना त्वरित सुरू कराव्यात
  • गेल्या 2 वर्षांपासून पात्र असूनही लाभ न मिळालेल्या कामगारांना त्वरित लाभ द्यावेत
  • दर 10 वर्षांनी कामगारांची नोंदणी करावी
  • घरेलू कामगारांचे वय 59 ऐवजी 70 पर्यंत वाढवावे
  • 60 वर्षांवरील सर्व घरेलू कामगारांना 3 हजार रुपये पेन्शन मिळावी
पुढील बातमी
इतर बातम्या