लता दीदींच्या स्मारकावरुन राजकारण नको; हृदयनाथ मंगेशकरांचं आवाहन

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

लतादीदींच्या जाण्याने आकाशाएवढी नाही तर अवकाशाएवढी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्या अवकाशाच्या पोकळीत अनेक गंगा जरी ओतल्या तरी ती पोकळी न भरून निघणारी आहे. लता मंगेशकर यांच्या स्मारकाचा वाद सुरू आहे. मात्र मंगेशकर कुटुंबीयांना त्या वादात भाग घेण्याची अजिबात इच्छा नाही. तसेच शिवाजी पार्क इथं लता मंगेशकर यांचे स्मारक व्हावे, अशीही इच्छा नाही. स्मारकावरून सुरू असणारा वाद आता राजकारण्यांनी थांबवावा, असं आवाहन पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी गुरुवारी केले.

भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवार ६ फेब्रुवारी रोजी निधन झालं. दुसऱ्या दिवसापासूनच लता मंगेशकर यांचे शिवाजी पार्कात स्मारक व्हावे, अशी मागणी विविध राजकीय पक्षांनी लावून धरली. याच पार्श्वभूमीवर हृदयनाथ मंगेशकर यांनी भावना व्यक्त केल्या.

राज्य सरकारने लता मंगेशकर यांना संगीत विद्यालय सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. दीदींनी स्वतः ही मागणी केली होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री उदय सामंत व आदित्य ठाकरे यांनी ती मान्य करून त्याची पूर्वतयारीही केली आहे.

लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून वाद सुरू आहे. आम्ही मंगेशकर कुटुंबीयांनी या वादात भाग घेण्याचे काही कारण नाही. आमची ती इच्छा नाही की, दीदींचे स्मारक शिवाजी उद्यान येथे व्हावे. याउलट आमचे म्हणणे आहे की, शिवाजी उद्यानाच्या स्मारकावरून जो राजकारणी लोकांचा वाद चालले आहे. तो वाद त्यांनी कृपया बंद करावा आणि दीदींच्या बाबतीत कोणतेही राजकारण करू नये, असे हृदयनाथ मंगेशकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

महाराष्ट्र शासनाने लता मंगेशकर संगीत विद्यालय स्थापन करण्याच्या निधीला आश्वासन दिले होते. ती विनंती स्वतः लता दीदींनी त्यांना केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री उदय सामंत, आदित्य ठाकरे यांनी ती अतिशय आनंदाने मान्य केली होती. त्याची सर्व पूर्व तयारी त्यांनी केलेली आहे. त्यामुळे दीदींचे एक संगीत स्मारक होत आहे.

त्यापेक्षा अन्य कोणतेही मोठे स्मारक होऊ शकत नाही. श्रद्धेला श्रद्धांजली वाहण्याची आवश्यकता नसते. लता मंगेशकर यांच्या निधनाने एक पर्व संपले आहे. एक पर्व नाही, तर एक युगांत झाला आहे, या शब्दांत हृदयनाथ मंगेशकर यांनी आपले मत स्पष्टपणे मांडले. 

पुढील बातमी
इतर बातम्या