बाबासाहेबांची जयंती ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरी होणार - राज्य सरकारचा निर्णय

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय सामाजिक न्याय विभागाने जाहीर केला आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांची आंबेडकरी अनुयायांकडून होत असलेली ही मागणी पूर्ण झाली आहे.

डॉ आंबेडकरांचे व्यक्तिमत्व म्हणजे अखंड ज्ञानाचा, प्रज्ञेचा झराच होता. त्यामुळे शासनाने 14 एप्रिल हा दिवस ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेऊन कृतज्ञता व्यक्त केल्याचं मत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी मांडलं. यापुढे बाबासाहेबांच्या जयंतीदिनी राज्यातील शाळा, महाविद्यालये, इतर शैक्षणिक संस्थेतील तज्ज्ञ वक्त्यांची व्याख्याने आयोजित करण्यात येतील. असंही ते म्हणाले.  

डॉ आंबेडकरांची ग्रंथसंपदा, विविध विषयांवर लिहिलेले महत्त्वाचे ग्रंथ, साप्ताहिके, पाक्षिके, दैनिके यातून केलेले लेखन, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकिय कार्ये असे उत्तुंग कार्य पाहता त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाची ओळख पटते. त्यामुळेच त्यांच्या प्रज्ञेची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली. त्यांना 'सिम्बॉल ऑफ नॉलेज' म्हणून देखील मान्यता दिली आहे, असेही राजकुमार बडोले यांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या