इंधन दरवाढीमुळं सर्वसामान्यांचा प्रवास होतोय महाग

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

रेल्वे प्रवासावर निर्बंध आणि बसमध्ये होणारी गर्दी, दिरंगाई यामुळे खासगी वाहनाने प्रवास करण्याकडे बहुतांश नोकरदारांचा कल वाढला आहे. परंतु दिवसेंदिवस वाढत चाललेल्या इंधनदरांमुळे हा प्रवास महाग होऊ लागला आहे. अशा महागाईत जगणे कठीण बनले आहे.

कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य सरकारनं कठोर निर्बंध लावले असले तरी, खासगी कंपन्या, उद्योग, मोठमोठे व्यवसाय यांचे काम थांबलेले नाही. अत्यावश्यक सेवांप्रमाणेच अनेक खासगी उद्योगांनाही र्निबधांतून सूट देण्यात आली आहे. मात्र, या नोकरदारांना रेल्वे प्रवासाची परवानगी नाही.

बहुतांश कर्मचारी खासगी दुचाकी, चारचाकी वाहनाने कामावर ये-जा करत आहेत. इंधन दरांत होणाऱ्या सततच्या वाढीमुळे त्यांचा हा प्रवास दिवसेंदिवस महाग होऊ लागला आहे. काही महिन्यांपूर्वी आठवड्याला २५० रुपयांचे पेट्रोल लागायचे, आता त्यासाठी ५०० रुपये मोजावे लागत आहेत. प्रवासाचा खर्च वाढला, परंतु पगार तेवढाच आहे.

कुरियर सेवा, वस्तू-जेवण घरपोच देणाऱ्या कंपन्या आणि इतर बऱ्याच आस्थापनांतील कर्मचारी फिरतीचे काम करतात. कंपनीच्या कामांसाठी त्यांना मुंबईभर फिरावे लागते. अशा कर्मचाऱ्यांची इंधन दरवाढीने वाताहत केली आहे. कंपनीकडून प्रवासासाठी दिलेली रक्कम इंधन दरवाढीमुळे अपुरी पडत आहे.


हेही वाचा - 

रिलायन्स करणार कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांचं मोफत लसीकरण

मत्स्य व्यावसायिकांना ठेका रक्कम भरण्यास ६ महिन्यांची मुदतवाढ

पुढील बातमी
इतर बातम्या