खोदकामामुळे नागरिक त्रस्त

  • प्रसाद कामटेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

लोअर परळ - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले आहेत. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी पालिकेत हजारो कोटींच्या विकासकामांचे प्रस्ताव मंजूर होत आहेत. याचाच एक भाग म्हणून शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी अचानक लोअर परळ परिसरात जलवाहिनेचे काम सुरू केले आहे. यामुळे रस्त्याचे खोदकाम केले आहे. या खोदकामामुळे नागरिकांना वाहतूक कोडींचा त्रास सहन करावा लागत आहे. जलवाहिनीचे काम एक आठवड्याहून अधिक दिवस सुरू आहे त्यामुळे हे काम कधी पूर्ण होईल आणि आमचा त्रास वाचेल असा सवाल अमित आंब्रे यांनी उपस्थित केला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या