ऐन दिवाळीत मुंबईतील थंडी गायब

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत मागील काही दिवसांपासून थंडी गायब झाली आहे. सध्या दिवाळी सुरू असून मुंबईकरांना उकाड्याच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. नोव्हेंबर महिन्याची सुरुवात गुलाबी थंडीनं झाली होती. परंतू, २ दिवसांपासून मुंबईच्या तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. कमाल तापमान ३६ अंश तर किमान तापमान २५ अंशांवर दाखल झालं आहे. 

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडील माहितीनुसार, मुंबईचं कमाल तापमान ३६ अंशांवर आहे. मागील ४८ तासांपासून हवामानात हे बदल नोंदविण्यात आले आहेत. त्याशिवाय पुढील ४८ तासांत तापमान ३६ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

कोकण विभागातही तापमानात वाढ नोंदविण्यात आली आहे. हे तापमान ३२ अंशांच्या आसपास असणार आहे. मुंबईच्या किमान तापमानात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला चांगली घसरण झाली होती. ते १९ अंशांच्या आसपास गेलं होतं. त्यामुळं मागील आठवडाभर मुंबईत थंडी होती. दिवाळीदरम्यान तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं अगोदरच वर्तवला होता.

पुढील बातमी
इतर बातम्या