रसायनयुक्त पाण्यामुळे प्रदूषण

  • योगेश राऊत & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कांदिवली - दत्ताजी पार्क येथे जिन्स कलर प्रोसेसिंग फॅक्टरीमधून रसायनयुक्त पाणी गटारात सोडण्यात येत आहे. त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा त्रास स्थानिक नागरिकांना होत आहे.

संबंधित व्यावसायिकाकडून हे पाणी कुठलीही शुद्धिकरण प्रक्रिया न करता गटारात सोडण्यात येत आहे. या संदर्भात "स्थानिक नागरिकांनी व्यावसायिकाला बऱ्याचदा समज देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले", असे बाजूच्या इमारतीत राहणाऱ्या एका राहिवाशाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. दरम्यान, पालिकेचे सहायक अभियंता सुनील व्हटकर यांनी मुंबई लाईव्हशी बोलताना सांगितले की " आमचे न्यूसेन्स डिटेक्टिव्ह जागेवर जाऊन खात्री करतील आणि तथ्य आढळल्यास संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात येईल".

पुढील बातमी
इतर बातम्या