कुणी उंदीर मारता का उंदीर...?

  • शेखर साळवे & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - वाढत्या आजारांच्या पार्श्वभूमीवर, शहरातील उंदीर मारण्यासाठीच्या महापालिकेच्या मोहिमेला पैसे वाढवूनही प्रतिसाद मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आलीये. लेप्टो स्पायरिससारख्या आजारांना पसरवणाऱ्या आणि घरादारांपासून गोदामांपर्यंत सर्वांनाच त्रासदायक ठरणाऱ्या मूषकराजांना आवरणं पालिकेला अशक्य होऊन बसलंय. उंदीर मारण्यासाठी प्रत्येक उंदरामागे 10 रुपयांवरून 18 रुपये दर केला तरी शहरभरातील 24 वॉर्डांमधून फक्त 38 अर्ज दाखल झालेत. त्यामुळे आता पालिकेने प्रस्तावातच बदल करण्याचा निर्णय घेतलाय.

पुढील बातमी
इतर बातम्या