मुंबई महापालिकेच्या (brihanmumbai municipal corporation) अंतर्गत येणाऱ्या प्रभाग समित्यांच्या (ward committe) अध्यक्षपदासाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
17 प्रभाग समित्यां पैकी 11 समित्यांच्या अध्यक्ष पदासाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने याठिकाणी अध्यक्षांची निवड बिनविरोध होणार आहे.
तसेच 6 प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी 5, 6 व 9 मार्चला निवडणूक होणार आहे. दरम्यान, ‘जी’ उत्तर आणि ‘एच‘ पूर्व या प्रभाग समित्यांसाठी एकच अर्ज आल्याने दोन्ही समिती अध्यक्षपदी उद्धव ठाकरे सेनेचे नगरसेवक असणार आहेत.
मुंबईतील (mumbai) वाढती लोकसंख्या लक्षात घेता प्रभाग समित्यांचा विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे 16 प्रभाग समित्यांमध्ये एकने वाढ होऊन 17 प्रभाग समित्या झाल्या आहेत.
पूर्वी के-पूर्व म्हणून ओळखली जाणारी प्रभाग समिती आता के-दक्षिण व के-उत्तर प्रभाग समिती म्हणून ओळखली जाणार आहे. मालाड पी-उत्तर प्रभाग समितीलाही यापुढे पी-उत्तर व पी-पूर्व प्रभाग समिती म्हणून ओळखले जाणार आहे.
मुंबई महापालिकेच्या ‘जी’ उत्तर अर्थात दादर प्रभाग समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार जोसेफ कोळी यांच्या विरोधात मनसेने यशवंत किल्लेदार यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे.
त्यामुळे महापालिका निवडणुकीमध्ये (bmc elections) एकत्र असलेले ठाकरे बंधूंचे शिलेदार आता एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत.
पुढील प्रभाग समिती अध्यक्षांची निवड बिनविरोध
सी-डी - आकाश पुरोहित, (भाजप)
के पश्चिम - रोहन राठोड, (भाजप)
के-दक्षिण/उत्तर - प्रकाश मुसळे, (भाजप)
पी-दक्षिण - श्रीकला पिल्ले (भाजप)
आर दक्षिण - लीना देहरकर, (भाजप)
आर-मध्य/उत्तर - प्रकाश दरेकर, (भाजप)
एम पश्चिम - आशा मराठे (भाजप)
एन - अश्विनी मते, (भाजप)
जी दक्षिण - पद्मजा चेंबूरकर, (शिवसेना, उबाठा)
एच पूर्व/पश्चिम - रोहिणी कांबळे, (शिवसेना, उबाठा)
एल - विजेंयंद्र शिंदे, (शिंदे शिवसेना)
एबीई - ज्ञानराज निकम, (काँग्रेस) वि. रोहिदास लोखंडे, (भाजप)
एफ दक्षिण/उत्तर - मानसी सातमकर, (शिवसेना) वि. श्रद्धा जाधव, शिवसेना (ठाकरे गट)
जी उत्तर - जोसेफ कोळी, शिवसेना (ठाकरे गट) वि. यशवंत किल्लेदार, (मनसे)
पी उत्तर-पूर्व - अजित रावराणे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) वि. हैदरअली असलम शेख, (काँग्रेस)
एम पूर्व - खैरनुसा हुसेन, (एमआयएम) वि. प्रज्ञा सदाफुले, (शिवसेना)
एस आणि टी - साक्षी दळवी, (भाजप) वि. सुरेश शिंदे, शिवसेना (ठाकरे गट)
17 प्रभाग समित्यांपैकी 11 प्रभाग समित्यांसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यामुळे या प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार आहे.
यात भाजपचे 8, शिवसेना 1, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 2 अध्यक्ष बिनविरोध निवडून येणार आहेत. यावेळी पहिल्यांदाच ‘एमआयएम’चा प्रभाग समिती अध्यक्ष बनणार आहे.
भांडुप ‘एस’ आणि मुलुंड‘टी’ प्रभाग समितीमध्ये भाजप - शिवसेना महायुतीचे 10 व शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, मनसे आघाडी यांचे 10 असे समसमान नगरसेवक असल्यामुळे येथे दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडणार आहेत.
त्यामुळे येथे चिठ्ठी टाकून अध्यक्ष कोण होणार? हे ठरणार आहे. दरम्यान, एबीई या प्रभाग समितीत शिवसेना ठाकरे, काँग्रेसचे 6 नगरसेवक असून भाजप - शिवसेनेचे 5 नगरसेवक आहेत. तर समाजवादी पार्टीचा एक नगरसेवक आहे.
समाजवादी पार्टीने महायुतीला मदत केल्यास येथेही समसमान मते पडणार आहेत. त्यामुळे येथेही अध्यक्ष चिठ्ठी उडवून ठरवावा लागणार आहे. येथे समाजवादी पार्टीने पाठिंबा न दिल्यास काँग्रेसचा विजय निश्चित आहे.
हेही वाचा