विजेच्या दरात वाढ होण्याची शक्यता

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

शिंदे आणि फडणवीस सरकार पुन्हा एकदा सर्वसामान्य ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक देणार आहे. वीजेच्या इंधन समायोजन शुल्काच्या दरात (Electricity bill) पुन्हा एकदा 60 ते 70 पैशांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिश्याला पुन्हा कात्री लागणार आहे.

राज्यात विजेच्या दरात 10 ते 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने आधीच घेतला आहे. आता नोव्हेंबर महिन्यात पुन्हा दरवाढ होणार आहे. वीज खरेदी खर्चातील वाढीपोटी महावितरणने 1500 कोटी रुपये राखीव ठेवले होते. तो निधी 2021 मध्येच संपला आहे.

त्यामुळे महावितरणने 1 एप्रिल 2022 मध्ये खरेदीच्या वाढीपोटी इंधन समायोजन शुल्क आकारण्यास सुरुवात केली. सध्या हे शुल्क 1.30 रुपये प्रति युनिट इतके आहे. आता पुढील महिन्यात महावितरण 60 ते 70 पैशांची वाढ करणार आहे. त्यामुळे इंधन शुल्कचा दर हा 2 रुपयांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आह.

महानिर्मितीकडून वीज खरेदी दरात वाढ झाल्यामुळे इंधन समायोजन शुल्कावर त्याचे परिणाम झाले आहे. मात्र तूर्तास अशी ही दरवाढ होणार नाही, सध्याचे इंधन समायोजन शुल्क नोव्हेंबरपर्यंत लागू होणार आहे, अशी माहिती महावितरणचे वाणिज्य संचालक डॉ. मुरहरी केळे यांनी महाराष्ट्र टाइम्स दैनिकाशी बोलताना दिली.

याआधी महाराष्ट्र वीज नियंत्रण मंडळाने 1 जून 2022 पासून वीज कंपन्यांना फ्यूल एडजस्टमेंट चार्ज (एफएसी) लावण्यास परवानगी दिली आहे. कोरोनाच्या काळात मागील दोन वर्षांमध्ये कोणतीही दरवाढ करण्यात आली नव्हती. तसंच कोणतीही दर आकारण्यात आले नव्हते.


हेही वाचा

मुंबई लाइव्हच्या बातमीची दखल, ई-इनव्हॉईसिंग मशीनवरच फोटो काढावे लागणार!

लालबाग, परेलमध्ये येणाऱ्या गणेश भक्तांसाठी 'इथं' पार्किंगची व्यवस्था

पुढील बातमी
इतर बातम्या