टेसला (Tesla) ने भारतातील पहिले इन-मॉल इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन Nexus Seawoods Mall, नवी मुंबई येथे सुरू केले आहे.
मॉलच्या B1 पार्किंगमध्ये उभारण्यात आलेल्या या स्टेशनमध्ये एकूण 8 चार्जर्स आहेत. यामध्ये 4 V4 सुपरचार्जर्स (250 kW फास्ट DC चार्जिंग) आणि 4 डेस्टिनेशन चार्जर्स (11 kW AC चार्जिंग) समाविष्ट आहेत. त्यामुळे ग्राहकांना जलद चार्जिंग तसेच दीर्घकालीन चार्जिंग अशा दोन्ही सुविधा मिळणार आहेत.
कंपनीनुसार, मॉलसारख्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यामागे उद्देश असा आहे की, ग्राहक खरेदी किंवा इतर कामे करत असताना सहजपणे वाहन चार्ज करू शकतील. टेसला (Tesla)च्या सुपरचार्जर तंत्रज्ञानामुळे Tesla Model Y ला केवळ 15 मिनिटांत सुमारे 275 किमी रेंज मिळू शकते.
चार्जिंगची संपूर्ण प्रक्रिया Tesla मोबाइल अॅपद्वारे नियंत्रित करता येते. या अॅपच्या मदतीने स्टेशन शोधणे, चार्जिंगची स्थिती तपासणे आणि पेमेंट करणे सोपे होते.
नवी मुंबईतील हे स्टेशन भारतातील Tesla चे चौथे चार्जिंग लोकेशन आहे. यापूर्वी गुरुग्राम, दिल्ली आणि मुंबईतही कंपनीची चार्जिंग सुविधा उपलब्ध आहे. आता देशभरात Tesla कडे 20 सुपरचार्जर्स आणि 14 डेस्टिनेशन चार्जर्सचे नेटवर्क तयार झाले आहे.
याशिवाय, मॉलच्या मुख्य भागात Tesla ने एक पॉप-अप स्टोअरही सुरू केले आहे, जिथे ग्राहकांना वाहनांची माहिती, टेस्ट ड्राइव्ह आणि इंटरॅक्टिव्ह डेमो अनुभवता येणार आहेत.
भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी आणि मजबूत चार्जिंग नेटवर्क तयार करण्याच्या दिशेने Tesla चे हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. Model Y या गाडीची किंमत भारतात सुमारे 59.89 लाख रुपयांपासून सुरू होते.
हेही वाचा