नाल्यालगतच्या झोपड्यांवर कारवाई

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महापालिकेच्या ब्रिमस्टोड प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या चेंबूरच्या कोकणनगर येथील काही झोपड्यांवर शुक्रवारी पालिकेने तोडक कारवाई करण्यात आली. गेल्या चार वर्षांपासून चेंबूर चरई नाल्याचा प्रकल्प अतिक्रमणामुळे रखडलेला आहे. 

यावर्षी पालिकेला हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून पालिकेने या नाल्यालागत असलेल्या झोपडीधारकांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. तसेच त्यांना माहुल गाव येथे पर्यायी घरे देखील दिली आहेत. मात्र आद्यापही रहिवाशांनी घरे रिकामी न केल्याने शुक्रवारी पालिका अधिकारी आणि कर्मचारी फौजफाट्यासह कोकणनगर परिसरात धडकले. त्यानंतर पालिकेने दुपारपर्यंत याठिकाणी आठ ते दहा घरे जमीनदोस्त केली असून उर्वरित घरे येत्या सोमवारी तोडण्यात येणार आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या