व्हिक्टोरिया होणार इतिहासजमा?

  • संतोष मोरे & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - मुंबईतल्या रस्त्यांवर 150 वर्षांपासून धावणारी व्हिक्टोरिया म्हणजे मुंबईला येणाऱ्या पर्यटकांसाठी एक आकर्षण. पण या घोडागाडयांचे चालक-मालक आपलं पोट भरण्यासाठी घोड्यांवर अमानुष अत्याचार करतात, असं प्राणीमित्रांचं म्हणणं आहे. त्यामुळेच या व्हिक्टोरियांवर बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका 'पेटा' या प्राणीमित्र संघटनेनं न्यायालयात केली आहे. व्हिक्टोरियांना दिलेल्या परवान्यांची मुदत संपल्यानं पोलिसांनी त्यांची वाहतूक रोखावी, अशी मागणी करणारं पत्रही पेटानं मुंबई पोलीस आयुक्तांना पाठवलंय. 2012नंतर या परवान्यांचं नूतनीकरण झालेलं नाही, अशी माहिती पेटाचे डॉ. मणिलाल वैलियेट यांनी दिली. तर, गाडी बंद करण्याबाबत कोणतीही सूचना अद्याप मिळालेली नाही, असं व्हिक्टोरिया चालक-मालकांचं म्हणणं आहे. प्रशासनानं उचित निर्णय घेतला नाही, तर या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा -

https://www.mumbailive.com/details/news/h/5/17004

पुढील बातमी
इतर बातम्या