अभियांत्रिकी, औषधनिर्माण सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल 3 जून 2017 रोजी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. एमएचटी-सीईटी 2017 ही परीक्षा 11 मे, 2017 रोजी घेण्यात आली होती.

पीसीएम गटात रामभिया स्मित धरमशी आणि मुंद्रा विजय जगदीश या विद्यार्थ्यांना 200 पैकी 197 गुण मिळाले आहेत. पीसीबी गटात अमेय प्रसाद या विद्यार्थ्याने 200 पैकी 190 इतके सर्वाधिक गुण मिळवले आहेत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये पीसीएम गटात हृषीकेश पवार या विद्यार्थ्याने 200 पैकी 190 गुण मिळवले आहेत. पीसीबी गटात गौरव कचोळे या विद्यार्थ्याने 200 पैकी 187 गुण मिळवले आहेत, अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त आणि सक्षम प्राधिकारी यांनी दिली आहे.

या परीक्षेत 23,078 उमेदवारांना पीसीएम गटात आणि 12712 उमेदवारांना पीसीबी गटात 100 किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. 2889 उमेदवारांना पीसीएम गटात तर 573 उमेदवारांना पीसीबी गटात 150 हून जास्त गुण मिळाले आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या