उडत्या विमानात महिलेची प्रसुती

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

आतापर्यंत रेल्वेत महिलेची प्रसुती झाल्याचं आपण ऐकलं किंवा वाचलं असेल. मात्र बुधवारी एका महिलेने चक्क उडत्या विमानत बाळाला जन्म दिला. अबुधाबीहून जकार्ताकडे जाणाऱ्या या विमानात गर्भवती महिलेला प्रसुती कळा सुरू झाल्यानंतर विमानातील प्रावासी आणि कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. दरम्यान प्रसुतीनंतर महिला आणि तिच्या बाळाच्या जीवाला कोणताही धोका उद्भवू नये म्हणून या विमानाचं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.

जकार्ताकडे जाणाऱ्या एतिहाद एअरवेजच्या विमानात महिलेला प्रसुती वेदना सुरू झाल्या. दरम्यान विमानातील कर्मचाऱ्यांसह महिला प्रवाशांच्या मदतीने विमानातच महिलेची प्रसूती करण्यात आली. त्यानंतर वैमानिकाने एअर ट्रॅफिक कंट्रोल अधिकाऱ्यांना संपर्क करून याची माहिती दिली.

महिला आणि बाळ सुखरुप

महिलेच्या प्रसूतीची माहिती मिळताच एटीसीनं वेळ न घालवता विमान मुंबई छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड करण्याचे आदेश दिले. त्यानंतर विमान मुंबईच्या दिशेने वळवण्यात आलं. दरम्यान विमान मुंबई विमानळावर लँड करताच महिला आणि तिच्या बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर विमान पुढच्या प्रवासासाठी रवाना झालं.

पुढील बातमी
इतर बातम्या