एसटी, बेस्ट पासला मुदतवाढ द्या; परिवहनमंत्र्यांकडे भाजप पदाधिकाऱ्याची मागणी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईसह देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना घराबाहेर कामासाठी पडण्यास परवानगी आहे. परंतु, -सामान्य प्रवाशांना बेस्ट व एसटीमधून प्रवास करण्यास बंदी आहे. त्यामुळं या काळासाठी दिलेल्या पासची मुदत वाढवावी किंवा त्याचे पैसे परत द्यावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या उत्तर मुंबई शाखेचे उपाध्यक्ष महेश भट्ट यांनी केली आहे. 

लॉकडाऊनच्या काळात काही बेस्ट व एसटी बससेवा सुरु आहेत. परंतु, त्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच आहेत. सामान्य प्रवाशांना त्यातून प्रवास नाकारण्यात आला आहे. बेस्ट तसंच एसटीचे हजारो प्रवासी नेहमीच वेगवेगळ्या कालावधीचा पास काढून त्यामार्फत प्रवास करत असतात. आता लॉकडाऊनच्या किमान २ महिन्यांच्या काळात त्यांना प्रवास नाकारल्यानं आधीच पास काढलेल्या प्रवाशांचं आर्थिक नुकसान होणार आहे. 

यासंदर्भात त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब व बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांना पत्र लिहिले आहे. केंद्र सरकारनं रद्द केलेल्या रेल्वेगाड्या आणि विमानं यांच्या तिकिटांचे पैसे प्रवाशांना परत दिले आहेत. त्याच धर्तीवर लॉकडाऊनच्या काळातील एसटी व बेस्ट पासचे पैसे परत द्यावेत किंवा यापुढील पास काढताना लॉकडाऊनच्या काळाएवढी विनाशुल्क मुदतवाढ प्रवाशांना द्यावी, अशी मागणी भट्ट यांनी केली आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या