आम्ही मुंबईतून हलणार नाही, शेतकरी बांधवांचा आक्रोश

  • मुंबई लाइव्ह टीम & मुंबई लाइव्ह नेटवर्क
  • सिविक

'जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आम्ही मुंबईतून हलणार नाही' अशा शब्दांत मुंबईत आलेल्या आंदोलनकर्त्यांनी आपला निर्धार स्पष्ट केला आहे. त्यामुळे आता विधानभवनात बसलेले सत्ताधारी आणि विरोधक या शेतकऱ्यांच्या मागण्यांची किती दखल घेतात हा महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे.

सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा विरोध करण्यासाठी नाशिकमधून शेतकरी बांधव मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. सुमारे २५ हजार शेतकरी मुंबापुरीत आले असून उद्या म्हणजेच सोमवारी हे लाल वादळ थेट विधानभवनावर धडकणार आहे.

कर्जमाफी, शेतमालाला योग्य भाव, विनाअट कर्जमुक्ती अशा मागण्यांसाठी हे शेतकरी बांधव मुंबईत धडकले आहेत. विधानभवनात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून त्या पार्श्वभूमीवर लाल बावटा घेऊन बंडाचं निशाण फडकावत हे २५ हजाराहून अधिक शेतकरी सोमवारी थेट विधानभवनावर धडकणार आहेत.

शेतकऱ्यांच्या या लाँग मार्चच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या