गिरगावमध्ये कोठारी हाऊसला अाग

  • मुंबई लाइव्ह टीम & सचिन धानजी
  • सिविक

गिरगावमधील कोठारी हाऊसला रविवारी सायंकाळी अचानक लाग लागली. शाॅर्ट सक्रिटमुळे अाग लागल्याची शक्यता वर्तवली जात अाहे. यामध्ये ३ कामगार अ़डकल्याची शक्यता अाहे. अागीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमनच्या ९ गाड्या दाखल झाल्या. अाग विझवण्याचे काम शर्थीने सुरू अाहे. 

">

तिसरा मजला खाक

गिरगावमधील अार. अार. रोडवर सेंट्रल सिनेमाजवळ चार मजली कोठारी मेन्शनला रविवारी सायंकाळी  ६ वाजता अाग लागली. व्यावसायिक वापरासाठी असलेल्या या इमारतीच्या दुसऱ्या अाणि तिसऱ्या मजल्यावर अाग वेगाने पसरली. ही  संपूर्ण इमारत लाकडी असून तिसरा मजला पूर्ण जळून खाक झाला. इमारतीच्या शेजारी अभिनेता सुनील शेट्टी यांची व्यायामशाळा अाहे.


पुढील बातमी
इतर बातम्या