अंधेरीतील लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये आग

  • मुंबई लाइव्ह टीम & राजश्री पतंगे
  • सिविक

अंधेरी लिंक रोडवर असलेल्या लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेटमधील दोन दुकानांना आग लागल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजून ४१ मिनटांच्या सुमारास घडली. ही आग कोणत्या कारणाने लागली याबद्दल अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी अथवा जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. 

या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ३ गाड्या, २ जेटी, आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशनम दलाला यश आलं आहे. पण या आगीमुळे अंधेरी लिंकरोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ही वाहतूक कोंडी हटवण्याचं काम सध्या वाहतूक पोलिसांकडून सुरू आहे. 

 

पुढील बातमी
इतर बातम्या