मुंब्रा येथील प्राइम हॉस्पिटलला आग; ४ रुग्णांचा मृत्यू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्यभरात एकीकडं कोरोनाचं संकटानं नागरिक त्रासले आहेत. तर, दुसरीकडं रुग्णालयांमध्ये अपघातांची मालिका सुरूच आहे. नाशिक आणि विरार येथील रुग्णालयांमध्ये आग लागल्याची घटना ही ताजी असतानाच आता ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा कौसा येथील प्राइम क्रिटीकेअर या हॉस्पिटलला लागून यांमध्ये ४ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.

बुधवारी पहाटे ३.४५ वाजताच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीची घटना घडली तेव्हा रुग्णालयात एकूण २० रुग्ण होते. यापैकी ६ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आग लागल्यानंतर २० रुग्णांना बाहेर काढण्यात यश आलं.

आयसीयूतील ६ रुग्णांना बिलाल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. त्यातील ४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये २ महिलांचा समावेश असल्याची माहिती मिळते. ही आग शॉर्टसर्किटमुळं लागल्याचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

मृतांची नावं :

  • यास्मिन जफर सय्यद (वय ४६)
  • नवाब माजिद शेख ( वय ४७)
  • हालिमा बी सलमानी ( वय ७०)
  • सोनावणे
पुढील बातमी
इतर बातम्या