विलेपार्लेतील प्राइम मॉलमध्ये भीषण आग

(Representational Image)
(Representational Image)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील विलेपार्ले पश्चिम इथल्या प्राइम मॉलच्या पहिल्या मजल्यावर शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली. चार मजली मॉलच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली. आग विझवण्याचे काम सुरू आहे.

अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी हजर आहेत. कोणतीही दुखापत झाली नाही. घटनेबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

प्राइम मॉलमध्ये सकाळी ११च्या सुमारास लागलेल्या आगीत आतापर्यंत कोणालाही इजा झाल्याचे वृत्त नाही, असं अधिकाऱ्यानं सांगितलं.

"कमीतकमी १३ अग्निशमन गाड्या, आठ पाण्याचे टँकर आणि अग्निशमन दलाच्या इतर गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे काम सुरू आहे," असं अधिकाऱ्यानं सांगितलं.

या आठवड्यात शहरात आगीची ही तिसरी घटना आहे.

पवई उपनगरातील एका ऑटोमोबाईल शोरूमच्या गॅरेजमध्ये गुरुवारी आग लागल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली आहे. पवईतील साकी विहार रोडवर असलेल्या साई ऑटो ह्युंदाई शोरूमच्या गॅरेजमध्ये सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली.

या आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईतील कांजूरमार्ग भागातील एका बहुराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक वस्तू कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये भीषण आग लागली. मात्र, पाच तासांहून अधिक अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली. यात कोणीही जखमी झाले नाही.


हेही वाचा

मुंबई सेंट्रल स्थानकात पहिले 'पॉड हॉटेल' सुरू, 'अशी' आहे सुविधा

पुढील बातमी
इतर बातम्या