कांजूरमार्गमध्ये भीषण आग, १२ गाड्या घटनास्थळी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईच्या कांजूरमार्ग परिसरातील हेवी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 

कांजूरमार्गमधील डब्बावाला कंपाऊंडजवळ ही भीषण आग लागली आहे. २ दुकानं जळाल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच काही झाडंही पेटली आहेत. 

(सविस्तर वृत्त लवकरच)


पुढील बातमी
इतर बातम्या