Fire at SRA building in Dahisar दहिसरमध्ये एसआरए इमारतीला आग

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत  बुधवारी सकाळी पावसाने जोर धरला असताना, दहिसरच्या शांतीनगर परिसरातील एसआए इमारतीला सकाळी आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. 

दहिसर (पूर्व)शांतीनगर एस आर ए जनकल्याण सोसायटी इमारत क्रमांक 1.बी,विंगच्या मीटर रुममध्ये बुधवारी सकाळी अचानक आग लागली. आगीची माहिती मिळतात अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या, आगीमुळे धुरांचे मोठे लोळ निघत होते. काही मिनिटात पोलिसांनी संपूर्ण इमारत रिकामी केली. अग्निशमनदलाने तातडीने इमारतीचा वीज पुरवठाखंडीत केल्यामुळे मोठी हानी टळली. या पूर्वी ही या ठिकाणी आग लागल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने या आगीत कोणतिही जीवित  हानी झाली नसल्याचे कळते. 

पुढील बातमी
इतर बातम्या