वांद्र्याच्या प्लॅटफॉर्म ४वर पहाटे लागली आग, व्हिडिओ व्हायरल

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

पश्चिम रेल्वेवरील वांद्रे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. गुरुवारी पहाटेदरम्यान ही आग लागल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही.

व्हिडिओ व्हायरल

ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या आग विझवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दोन जण ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या ही आग विझवण्यात यश आलं असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या