गोरेगावमध्ये गोदामाला भीषण आग, १५ जणांची सुखरुप सुटका

  • मुंबई लाइव्ह टीम & राजश्री पतंगे
  • सिविक

गोरेगाव येथील इटालियन इंडस्ट्रीयल इस्टेटमधील गोदामाला बुधवारी सकाळी ७ वाजून १९ मिनिटांनी भीषण आग लागली. दरम्यान अग्निशमन दलाच्या ८ गाड्या आणि पाण्याचे ६ टँकर घटनास्थळी दाखल झाले. या आगीत दोन गोदामं जळून खाक झाली आहेत. पण सुदैवाने गोदामात अडकलेल्या १५ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

आग विझवण्यात यश

गोरेगाव येथील ओबेरॉय मॉल परिसरात असलेल्या इटालियन इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये कपडे बनवण्याचं हे गोदाम आहे. बुधवारी सकाळी या गोदामातील कापडांनी पेट घेतल्यानंतर आगीने भीषण रुप धारण केलं. दरम्यान स्थानिकांनी याची माहिती अग्नशमन दलाला दिल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने ८ फायर इंजिन आणि सहा पाण्याचे टँकर यांच्या सहाय्याने आग विझवली. यामध्ये दोन गोदामं जळून खाक असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पुढील बातमी
इतर बातम्या