जोगेश्वरीत गोदामाला भीषण आग

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक
मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील एका गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. गुरुवारी पहाटेच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळते. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. 

गोदामाला आग लागल्याची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

मुंबईतील जोगेश्वरी परिसरात गोदाम असून गुरुवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीनं रौद्ररुप धारण केलं आहे. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. त्यामुळे ही आग कशी लागली याचा तपास अग्निशमन दलाचे जवान व पोलीस करत आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या