मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर लागली आग

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत मंत्रालयात आग लागल्याची घटना घडली आहे. सात मजली असलेल्या या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ही आग लागली आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर अग्निशामक दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या आहेत. रात्री ८.४५ च्या सुमारास ही आग लागल्याचं समजतं. शॉट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आलं आहे.

याआधीही मंत्रालयाला आग लागली होती. २०१२ च्या जून महिन्यात मंत्रालयाला भीषण आग लागली होती. आतापर्यंत मंत्रालयात लागलेली ही सर्वात मोठी आग होती. दरम्यान, गेल्या महिन्यात मुंबईतील माझगाव इथं असलेल्या जीएसटी भवनाला भीषण आग लागली होती. इमारतीच्या आठव्या मजल्यावर लागलेल्या आगीनंतर आठवडाभर जीएसटी भवन बंद होतं.


पुढील बातमी
इतर बातम्या