दक्षिण मुंबईतील इमारतीला आग, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईच्या मस्जिद बंदर स्टेशन बाहेर एका ७ मजली इमारतीला भीषण आग लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रहिवासी इमारतीला ही आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्रिशमन दल आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आग मोठी नाही पण इमारतीमधून लोकांना रेस्क्यू केलं जात आहे. नागरिकांना बाहेर काढत असल्याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, आग विझवण्यात यश आलं असून यामध्ये कोणीही जखमी झालं नाही.


पुढील बातमी
इतर बातम्या