पहिल्याच दिवशी शिवशाही बस हाऊसफुल्ल

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

चाकरमान्यांसाठी मुंबई-रत्नागिरी मार्गावर सुरू केलेल्या वातानुकूलित शिवशाही बसला प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी बस हाऊसफुल्ल झाली. प्रवाशांच्या या उदंड प्रतिसादाबद्दल राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी प्रवाश्यांचे आभार मानले.

सर्वसामान्यांना परवडावी म्हणून माफक तिकीट दरात वातानुकूलित बससेवा एसटी महामंडळाकडून सुरू करण्यात आली. रत्नागिरीपर्यंतचे बसचे तिकीट 556 रुपये आहे. अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज अशी शिवशाही वातानुकूलित बस शनिवारी रात्री 9.45 वाजता मुंबई सेंट्रल बसस्थानकातून रत्नागिरीसाठी रवाना झाली. विशेष म्हणजे, या बसची सर्व 45 आसने, बस सुटण्यापूर्वीच आरक्षित झाली. 

रविवारी रत्नागिरीहून सुटणाऱ्या या बसची सर्व आसने एक दिवस अगोदरच आरक्षित झाली आहेत. 'शिवशाही' बसला प्रवाशांचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता, भविष्यात ही सेवा लोकप्रिय होईल.

रणजीत सिंह देओल, उपाध्यक्ष, एसटी महामंडळ

पुढील बातमी
इतर बातम्या