मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; ५ ठार, ५ जखमी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर किलोमीटर ३६ जवळ हॉटेल फूड मॉल समोर पुण्याहून मुंबईकडे भरधाव वेगानं जाणाऱ्या कंटेनरनं ४ ते ५ वाहनांना जोरदार धडक दिल्यानं झालेल्या अपघातात ५ जण ठार झाले असून ५ जण जखमी झाले आहेत. हा अपघात मध्यरात्री १२.४५ च्या सुमारास घडला. क्रेटा, इनोव्हा, ट्रेलर, ट्रक अशा ५ वाहनांचा हा अपघात  झाला आहे. ४ मृतदेह खोपोली नगरपरिषदेच्या रुग्णालयात आणण्यात आले आहेत तर एका जखमीचा रुग्णालयात मृत्यू झाला.

या अपघातात नवी मुंबई महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी वैभव झुंजारे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचा मृत्यू झाला आहे. वैभव झुंजारे हे त्यांच्या खासगी कारनं ते नवी मुंबईच्या दिशेनं जात असताना हा अपघात घडला. यात त्यांची आई, पत्नी व मुलीचा मृत्यू झाला आहे. झुंजारे हे सोलापूर येथील गावी कुटुंबाला घेऊन येण्यासाठी गेले होते. कोरोना काळात त्यांच्यावरही कोरोना नियंत्रणाची जबाबदारी असल्यानं खबरदारी म्हणून त्यांनी आई, वडील, पत्नी व मुलांना गावी ठेवलं होतं.

मृतांची नावं

  • श्रीमती मंजू प्रकाश नाहर, वय ५८, रा. इंद्रपुरी, ६०२, जवाहर नगर, एस.व्ही.रोड, गोरेगाव पश्चिम
  • डॉ. वैभव वसंत झुंझारे, वय ४१, रा. ए/१-३,४, अधिकारी वसाहत, न.मु.महानगरपालिका, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई
  • उषा वसंत झुंझारे, वय ६३, रा. ए/१-३,४, अधिकारी वसाहत, न.मु.महानगरपालिका, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई
  • वैशाली वैभव झुंझारे, वय ३८, रा. ए/१-३,४, अधिकारी वसाहत, न.मु.महानगरपालिका, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई
  • श्रिया वैभव झुंझारे, वय-५, रा.ए/१-३,४, अधिकारी वसाहत, न.मु.महानगरपालिका, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई

अपघातात जमखी

  • स्वप्नील सोनाजी कांबळे, ३० वर्षे, रा. फ्लॅट नं. २०१, इंद्रपुरी, जवाहर नगर, एस.व्ही.रोड, गोरेगाव (पश्चिम) (जखमी)
  • प्रकाश हेमराज नाहर, वय-६५, रा. इंद्रपुरी, ६०२, जवाहर नगर, एस.व्ही.रोड, गोरेगाव पश्चिम, (जखमी)
  • अर्णव वैभव झुंझारे, वय-११, रा.ए/१-३,४, अधिकारी वसाहत, न.मु.महानगरपालिका, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई, (जखमी)
  • किशन चौधरी, (गंभीर जखमी)
  • काळूराम जमनाजी जाट (गंभीर जखमी)


हेही वाचा -

पुढील बातमी
इतर बातम्या