सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसामुळे मुंबई (mumbai) शहराला आणखीन काही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) मोठ्या प्रमाणात विमानांना विलंब (late) झाला आहे.
खराब हवामानामुळे अनेक विमान उड्डाणांवर परिणाम झाला, काही उड्डाणे रद्द करण्यात (cancelled) आली आणि एक विमान अन्यत्र वळवण्यात आले. सरासरी उड्डाण विलंब सुमारे 56 मिनिटे असल्याचे नोंदवले गेले.
मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी झाली आहे आणि प्रवेश रस्त्यांवर गर्दी वाढली आहे, ज्यामुळे येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांना त्रास होत आहे.
परिस्थिती लक्षात घेता, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (csmia) प्रशासनाने प्रवाशांना अपडेट राहण्याचे आणि नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.
त्यांनी आवाहन करताना म्हटले आहे की,"प्रतिकूल हवामान आणि मुसळधार पावसाच्या अंदाजामुळे, प्रवाशांना विमानतळावर जाण्यापूर्वी त्यांच्या संबंधित विमान कंपन्यांशी संपर्क साधून त्यांच्या विमानांची स्थिती तपासण्याची विनंती करण्यात येत आहे. सुरक्षा प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी प्रवाशांना नेहमीपेक्षा लवकर विमानतळावर पोहोचण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आम्ही सुरळीत प्रवास करण्यासाठी प्रयत्नशील असताना तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद."
हेही वाचा