मुंबईत अद्ययावत अन्न चाचणी लॅब सुरू होणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

रस्त्यांवरील खाद्यपदार्थांची अचूक तपासणी करण्यासाठी मुंबईतील वांद्रे पूर्व बीकेसी व छत्रपती संभाजी नगर येथील अद्ययावत मोबाईल फूड टेस्टिंग अन्न चाचणी प्रयोगशाळा सोयीसुविधांसह सज्ज झाली आहे. 

दोन्ही ठिकाणच्या अद्ययावत प्रयोगशाळेसाठी केंद्र सरकारने प्रत्येकी 450 कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी बीकेसीतील प्रयोगशाळेचे उद्घाटन ऑनलाईन (व्हर्च्युअल) पद्धतीने राजकोट येथून करण्यात आले. 

यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया या कार्यक्रमासाठी ऑनलाईन उपस्थित असणार आहेत. अन्न व औषध प्रशासनाने मुंबई येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम व खासदार पूनम महाजन उपस्थित असणार आहेत.

प्रयोगशाळेचे कामकाज प्रगतिपथावर आहे. महाराष्ट्र शासन या प्रयोगशाळा उभारणीचे कामकाज अचूक व जलदगतीने होण्यासाठी प्रयत्नशील आहे. लवकरच छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेचे उद्घाटन होणार आहे.


हेही वाचा

बाणगंगेच्या जीर्णोद्धाराचा मार्ग मोकळा

सायन ब्रिज तोडण्याचे काम 29 फेब्रुवारीपासून सुरू होणार

पुढील बातमी
इतर बातम्या