पादचारी पुलाची दुरवस्था

  • भूषण शिंदे & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुलुंड: मुलुंड रेल्वे स्थानका शेजारील पूर्व पश्चिम पादचारी पूल दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे. या पुलावरून मुलुंडकरांची सतत वर्दळ असते. या पुलाची दुरुस्ती करून याचे आयुष्य वाढवण्याची गरज आहे. परंतु प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. याआधी 2015 मध्ये एप्रिल च्या दरम्यान या पुलाचा काही भाग रात्रीच्या सुमारास कोसळला होता. यामुळे पुलाला मोठे भगदाड पडले होते. सुदैवाने तेव्हा रात्रीची वेळ असल्याने लोकांची वर्दळ कमी होती त्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही. त्या नंतर तातडीने दुरुस्ती करून हे भगदाड बंद करण्यात आले. परंतु याच घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. 'दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी आताच काळजी घेणे गरजेचे आहे' असे मत मुलुंड मधील रहिवासी किशोर चव्हाण यांनी व्यक्त केले.

पुढील बातमी
इतर बातम्या