मादाम कामा वसतिगृहातील 'या' विद्यार्थिनींना दिलासा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं परदेशी व परप्रांतीय नागरिकांना आपल्या घरी जाता येत नाही आहे. धावपळ व् धक्काबुक्की सहन करत नागरिकांना प्रवास करावा लागतो आहे. परंतु काही जण अजूनही मुंबईत आहेत. मुंबई विद्यापीठाच्या मादाम कामा वसतिगृहात अफगाणिस्तान येथील ४ विद्यार्थिनी अडकून पडल्या आहेत. मागील अनेक दिवसांपासून या विद्यार्थिनींच्या जेवणाची गैससोय होत असल्याची माहिती समोर येत आहे.

वसतिगृहातील ४ जणींच्या जेवणाची गैरसोय होत असल्याची तक्रार १४ मे रोजी युवा सेनेच्या अधिसभा सदस्य शीतल देवरुखकर-शेठ यांनी विद्यापीठाकडे केल्याचं समजतं. मात्र, याकडे लक्ष न दिल्यानं शीतल यांच्या सूचनेनुसार कुलाबा विधानसभा विभाग अधिकारी प्रथमेश सकपाळ व युवासैनिक पवन धोत्रे, यश काते, स्वप्निल महाडिक यांच्यामार्फत १ महिन्याचे अन्नधान्य आणि भाज्या पुरवण्यात आल्या.

लॉकडाउनच्या काळात मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहात अडकलेल्या विद्यार्थ्यांना छात्रभारतीनं अन्नधान्य व दैनंदिन वापराच्या वस्तूंचे वाटप केले. विद्यापीठाच्या कम्युनिटी किचनच्या माध्यमांतून शेकडो लोकांना अन्नवाटप केले जात आहे पण वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मात्र मोफत जेवण देण्याचा निर्णय प्रशासन अजून घेत नसल्याचे समजतं.

पुढील बातमी
इतर बातम्या